नवापुरात पुन्हा दोन लाख कोंबड्या नष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST2021-02-26T04:45:23+5:302021-02-26T04:45:23+5:30

गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू संसर्ग आजाराने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठ्या कुकुट पक्ष्यांच्या या बाजाराला मोठे ...

Two lakh hens will be destroyed in Navapur again | नवापुरात पुन्हा दोन लाख कोंबड्या नष्ट करणार

नवापुरात पुन्हा दोन लाख कोंबड्या नष्ट करणार

गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू संसर्ग आजाराने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठ्या कुकुट पक्ष्यांच्या या बाजाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. किलिंग ऑपरेशनमध्ये विसरवाडी येथील पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाकडून बंगलावाला पोल्ट्री फॉर्ममध्ये ९ हजार ६५ कुक्कुट पक्षी व १२ हजार २९० अंडी तर जावेद पोल्ट्री मोहम्मद साबिर बंगला वाला यांच्या ३ हजार ४७० कुक्कुट पक्षी व ६ हजार ७७८ अंडी नुकतीच नष्ट करण्याचे काम पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे पूर्ण करण्यात आले. पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव नवापुरात झाल्याने शोली पोल्ट्रीतील अडीच लाख कुकुट पक्षी व अंडी नष्ट करण्यात येणार आहे.

नवापूर तालुक्यात आतापर्यंत एकूण २५ कुक्कुटपालन केंद्रातून ५ लाख ९९ हजार २०३ कुक्कुट पक्षी व २५ लाख ७२ हजार ८८८ अंडी बर्ड फ्लू आजारामुळे नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुका बर्ड फ्लूचा महाराष्ट्र राज्यातील मोठा हाॅटस्पाट ठरला आहे. नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूचे लोन थेट गुजरात राज्यसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील पसरले आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू होता परंतु बर्ड फ्लूचा शिरकावने पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला आहे. पंचवीस पोल्ट्री व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाशिम पोल्ट्रीतील मोठ्या प्रमाणात यंग बर्ड किलिंग केल्याने आरिफ बलेसरीयाया सह अन्य काही पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने योग्य दरात शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी व्यावसायिक यांनी केली आहे.

Web Title: Two lakh hens will be destroyed in Navapur again