शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक, दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरपूर येथून देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिरपूर येथून देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. त्यात दोघांना रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास डामरखेडा गावाजवळ घटना घडली.सिंधूबाई विजय पावरा (२२) व निकिता दिनेश पावरा (साडेसात वर्ष) असे मयतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला असून शहादा पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, विजय पावरा (रा.घोटाळी, ता.शहादा, ह.मु.शिरपूर) हे आपल्या कुटुंबीयांसह मोटारसायकलीने (क्रमांक एम.एच.१८-७५६३) शिरपूर येथून देवमोगरा येथे याहामोगी देवीच्या दर्शनाला जात होते. डामरखेडा गावालगत मागून भरधाव वेगाने येणाºया ट्रकने (क्रमांक जी.जे.२७ जे-३०१०) जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील सिंधूबाई विजय पावरा (२२) व निकिता दिनेश पावरा (साडेसात वर्ष) गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. विजय पावरा यांना किरकोळ दुखापत झाली.घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ गोळा झाले. जखमींना गावातील खासगी वाहनाने शहादा येथील पालिका रुग्णालयात आणले असता त्यांच्या मृत्यू झाला.दिनेश प्रेमसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहेत.