चिंचपाडय़ात दोन घरे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:56 IST2019-08-03T12:56:37+5:302019-08-03T12:56:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा संततधार पावसामुळे दोन घरे कोसळून नुकसान झाल़े दरम्यान कोणत्याही प्रकारची जिवितहानी ...

Two houses collapsed in Chinchpadia | चिंचपाडय़ात दोन घरे कोसळली

चिंचपाडय़ात दोन घरे कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा संततधार पावसामुळे दोन घरे कोसळून नुकसान झाल़े दरम्यान कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नसल्याची माहिती आह़े 
चिंचपाडा परिसरात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आह़े यातून गावातील प्रभाग क्रमांक  तीनमधील रजेसिंग उदेसिंग वसावे व मादरीबाई विठ्ठलसिंग वसावे यांच्या मालकाचे घर कोसळून नुकसान झाल़े दोघा घरांचा छताचा वरचा भाग कोसळला़ दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मध्ये गुलाबसिंग नूरजी वसावे यांच्या मालकीच्या घराचेही पावसामुळे नुकसान झाले आह़े पावसामुळे चिंचपाडय़ातील जीर्ण असलेल्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात येत आह़े तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आह़े प्रशासनाने तलाठी व मंडळाधिका:यांकडून पंचनामा करुन घ्यावा अशी अपेक्षा नुकसानग्रस्तांची आह़े 
 

Web Title: Two houses collapsed in Chinchpadia