शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतरही दोन आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्यरक्षक म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ...

संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्यरक्षक म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहादा तालुका क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा शुभारंभ १६ फेब्रुवारीला करण्यात आला. या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यांना १६ मार्च रोजी दुसरा डोसही देण्यात आलेला आहे.

लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर शहादा तालुका क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ४५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने १७ मार्चला तपासणीसाठी घशातील स्वॅबचे नमुने दिले होते. १९ मार्चला सायंकाळी उशिरा या महिलेचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. असाच प्रकार एका पुरुष कर्मचाऱ्याबाबत घडला असून त्याचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला होता. दोघांनी १६ फेब्रुवारीला पहिला डोस घेतला. त्यानंतर २८ दिवसांनी १६ मार्चला लसीचा दुसरा डोस घेतला. याप्रमाणे लसीकरणाचे नियम पाळून दोन्ही कर्मचारी आपापल्या नियमित सेवेवर कार्यरत होते. मात्र सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. याच दरम्यान या दोघांनी पुन्हा १७ मार्चला तपासणीसाठी नमुने दिले असता दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची विशेष लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे