शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:18 IST2020-12-21T12:18:08+5:302020-12-21T12:18:15+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात हाणामारी झाल्याची घटना खापर, ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा ...

Two families beaten over a farm road dispute | शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात मारहाण

शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात मारहाण

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात हाणामारी झाल्याची घटना खापर, ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, खापर येथील गंगापूररोडकडे जाणाऱ्या शेतातील रस्त्यावरून जगन उत्तम पाडवी व रवींद्र रामा वसावे यांच्यात वाद होता. वादाचे पर्यावसान १८ डिसेंबर रोजी मारहाणीत झाले. जगन पाडवी यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, रवींद्र उत्तम पाडवी व ललीत जगदीश जाट, लुणकरण जगदीश जाट यांनी मारहाण केली, अंगावरील कपडे फाडले व दमदाटी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी फिर्याद रवींद्र वसावे यांनी दिली. शेताील रस्ता का नांगरून टाकला म्हणून विचारणा केली असता जगन पाडवी यांनी मारहाण करून दमदाटी केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहन शिरसाठ व विजय वसावे करीत आहे. 

Web Title: Two families beaten over a farm road dispute