नंदुरबार जिल्ह्यात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:58 IST2020-07-25T12:57:51+5:302020-07-25T12:58:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या आता २२ झाली आहे. ...

Two corona victims die in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या आता २२ झाली आहे. मयतांमध्ये भोईगल्ली, नंदुरबार व आष्टे, ता.नंदुरबार येथील वृद्धांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ४३७ झाली आहे.
नंदुरबारातील नवी भोईगल्ली भागात राहणाऱ्या ६० वर्षीय कोरोना बाधीतावर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरू होता. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय आष्टे, ता.नंदुरबार येथील ७० वर्षीय महिलेला गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या महिलेचाही मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलेचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. या दोन्ही मृत्यूमुळे कोरोनामुळे मयत झालेल्यांची एकुण संख्या आता २२ झाली आहे. या दोन्ही मयतांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १० नवीन रुग्ण आढळल्याने बाधितांची जिल्ह्यातील संख्या आता ४३७ झाली आहे.

Web Title: Two corona victims die in Nandurbar district