शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी विभागाने पकडलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : दारूबंदी विभागाने वर्षभरापूर्वी पकडलेला व जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभा असलेला पाच लाखांचा चारचाकी मिनी ट्रक चोरट्यांनी पळवल्याची ...

नंदुरबार : दारूबंदी विभागाने वर्षभरापूर्वी पकडलेला व जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभा असलेला पाच लाखांचा चारचाकी मिनी ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना १७ मार्च रोजी घडली. मुख्य प्रशासकीय इमारत आवारात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासकीय इमारतीत दारूबंदी विभागाचे कार्यालय आहे. या विभागाने जप्त केलेली वाहने येथील आवारातच उभी केली जातात. त्यासाठी इमारतीमागील मोकळी जागा देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी दारूबंदी विभागाने अवैध दारू वाहतूक करणारा मिनी ट्रक क्रमांक (एमएच १० एडलब्ल्यू ७०) पकडला होता. त्यातील मद्यसाठा गोडावूनमध्ये ठेऊन मिनी ट्रक जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस उभा करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून हा ट्रक तेथेच उभा होता. दरम्यान, चोरट्यांनी १० ते १७ मार्च दरम्यान हा ट्रक चोरून नेला आहे. १७ रोजी सकाळी दारूबंदी विभागाला हा मिनी ट्रक जागेवर नसल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध झाली, परंतु उपयोग झाला नाही.

याबाबत दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी विभागातर्फे पोलिसांना वाहनाची सर्व कागदपत्र देण्यात आली असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. प्रशासकीय कार्यालय आवारातूनच तब्बल पाच लाखांचे वाहन चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.