शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्याजवळ ट्रक उलटून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:15 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर :  शेवाळी ते नेत्रंग  महामार्गावर अक्कलकुवा शहराजवळ खड्ड्यात आदळून ट्रक उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर :  शेवाळी ते नेत्रंग  महामार्गावर अक्कलकुवा शहराजवळ खड्ड्यात आदळून ट्रक उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे.नागपूरहून अहमदाबादकडे केमिकल वाहून नेणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय-९२४४ रविवारी रात्री महामार्गावर वाण्याविहीर ते अक्कलकुवादरम्यान अचानक उलटल्याचे दिसून आले. भरधाव वेगातील ट्रक खड्ड्यात आदळून हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातात चालक आणि वाहक दोघेही बचावले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर वाण्याविहीर ते राजमोही व अक्कलकुवा शहरादरम्यान मोठेमोठे खड्डे पडून रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यातून वाहनधारक खड्डे टाळण्यासाठी भरधाव वेगातही कसरत करत आहेत. याच दरम्यान अशा प्रकारचे अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.राजमोही फाटा ते मोलगी नाका यादरम्यान मोठमोठे खड्डे असल्याने अवजड वाहनचालक त्यांना टाळून वाहने पुढे काढण्याचा प्रयत्न करतात. यातून वाहनांचा कट लागणे, दुचाकी घसरणे यासह छोटेमोठे अपघात नित्याचे झाले असल्याची माहिती आहे.