शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी संस्कृती जगाला प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी संस्कृती ही देशाला प्रेरणा देणारी आहे़ परंतू संस्कृतीचा घटक असलेल्या आदिम समुदायाच्या समस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी संस्कृती ही देशाला प्रेरणा देणारी आहे़ परंतू संस्कृतीचा घटक असलेल्या आदिम समुदायाच्या समस्या ह्या ऐकून घेतल्या जात नसल्याचा सूर शहरात आयोजित जनजाती चेतना परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला़छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ट्रायफेड भारत सरकारचे चेअरमन रमेशचंद्र मिणा, जनजाती सुरक्षा मंचचे अखिल भारतीय प्रमुख हर्ष चव्हाण, प्रांत सचिव पश्चिम महाराष्ट्र शरद शेळके, इंदौर येथील पोलीस उपअधीक्षक अमृता सोलंकी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ़ हिना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी,  भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.कांतीलाल टाटिया, राजेंद्रकुमार गावीत, सखाराम पाडवी, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष चैत्राम पवार, आप की जय परिवाराचे जितेंद्र पाडवी, मौल्या गावित, डॉ.मनिष सुर्यवंशी, अ‍ॅड.सावंत वळवी, निवृत्त अधिकारी आशा पाडवी, रेखा नाईक, मीनाक्षी गवळी, सोनाली पाडवी उपस्थित होते़यावेळी बोलताना जनजाती सुरक्षा मंचचे चव्हाण यांनी सांगितले की, जनजाती समाजाच्या समस्या कुणी ऐकू शकत नाही. त्या समस्या आजही प्रलंबित आहेत़ जनजाती समाजाची प्रतिमा आणि अवस्था यात खुप फरक आहे. समस्या वेगळ्या असून त्यावर वेगळेच समाधान केले जाते. असे न होता जनजाती समाजाविषयी असलेली विचारसरणी बदलून समस्या ज्या आहेत त्यावर योग्य समाधान व्हावे़ट्रायफेडचे चेअरमन मीणा यांनीही आदिवासी समुदायाच्या विविध पैलंूवर प्रकाश टाकत आदिवासी संस्कृती सर्वपरीने जगाला प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले़परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, अ‍ॅड़ भगतसिंग पाडवी, डॉ.विशाल वळवी, विरेंद्र वळवी आदींनी परिश्रम घेतले़परिषदेच्या उद्घाटनापूर्वी अंधारे चौकातून सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीतून संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले़ मान्यवरांचाही रॅलीत सहभाग होता़