मालदा येथे ६४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:47+5:302021-04-18T04:29:47+5:30

तळोदा तालुक्यातील मालदा गावात सुरुवातीला काही रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर तेथे सलग दोन दिवस गावातील तरुणांच्या पुढाकाराने ...

Treatment of 64 patients in isolation ward at Malda | मालदा येथे ६४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार

मालदा येथे ६४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार

तळोदा तालुक्यातील मालदा गावात सुरुवातीला काही रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर तेथे सलग दोन दिवस गावातील तरुणांच्या पुढाकाराने गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. सर्वच कुटुंबातील सदस्यांची तपासणी केल्यानंतर ६४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण हे स्वतः आपल्या आरोग्य पथकासह गावात तळ ठोकून होते. त्यांनी बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करून त्यांना गावातील शाळेतील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. विशेष म्हणजे एकही रुग्ण गंभीर नाही. डाॅ.चव्हाण हे आदिवासी बोलीभाषेत गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील भीती दूर करीत आहेत. गावातील तरुण व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. ग्रामपंचायतीनेही घरोघरी जाऊन औषध फवारणी सुरू केली आहे. कोरोना महामारीने दुर्गम भागात प्रवेश केल्याने ग्रामीण भागातील जनतेने सजग राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Treatment of 64 patients in isolation ward at Malda