आरटीओ कार्यालयातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:37 IST2020-08-12T12:36:50+5:302020-08-12T12:37:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या ...

Transfers of four officers in the RTO office | आरटीओ कार्यालयातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

आरटीओ कार्यालयातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी राज्य शासनाकडून काढण्यात आले़ चौघांची राज्यातील विविध ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागी लवकरच नवीन अधिकारी नियुक्त होतील़
प्राप्त झालेल्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक अनिल संभाजी केदार यांची धुळे, सुरेंद्र बुधाजीराव चौरे यांची ठाणे, अविनाश बबनराव अंभोरे यांची सोलापरू येथे बदली झाली आहे़ तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांची परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आल्याचे आदेश आरटीओ कार्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान बदली झालेल्या चारही अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र अद्याप नियुक्त झालेले नाहीत़ लवकरच त्यांच्या जागी अधिकारी नियुक्तीचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Transfers of four officers in the RTO office