शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पिसावर येथे तीन टन कचरा संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिसावर, ता.कुकरमुंडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिसावर, ता.कुकरमुंडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. यानिमित्त श्री समर्थ बैठकीच्या सदस्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानात तीन टन कचरा संकलीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुकरमुंडाचे माजी सरपंच डॉ.विजय पटेल होते. प्रतिमा अनावरण पिसावरचे सरपंच अशोक लाश्या ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच बबन धुडकू पानपाटील, सदस्य राजेंद्र विक्रम पाटील, वि.का. सोसायटीचे सचिव बन्सी ओंकार पाटील, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दामोदर देवचंद ठाकरे, ग्रा.पं. सदस्य चंद्रसिंग भिल, भगवान भिल, छोटू भिल, संगणकतज्ञ सचिन पानपाटील, उत्तम भिल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाआधी नंदुरबार, तळोदा व शहादा येथील श्री समर्थ बैठकीच्या 65 सदस्यांनी संपूर्ण गावभर स्वच्छता अभियान राबवून तीन टन कच:याचे संकलन केले. त्यानंतर संपूर्ण परिसरात रांगोळ्या, फुलांची सजावट, ग्रामपंचायत कार्यालय सजावट आदींनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सोहळ्याची सुरुवात स्वागतगीताने झाली. श्री गणेश पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात उत्सव प्रभाकर पाटील यांनी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा, ता.अलिबाग व श्री समर्थ बैठक याबाबतची माहिती विशद केली. सत्कार समारंभानंतर डॉ.अरुण नानासाहेब देसले, मंगला रवींद्र महाले, विजय भगवान चौधरी यांनी मनोगतातून प्रतिष्ठानच्यावतीने केल्या जाणा:या स्वच्छता अभियान, स्मशानभूमी, कब्रस्तान स्वच्छता, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, साक्षरता आदींची माहिती दिली.  या सोहळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील  श्री सदस्य, गावातील व  परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण देसले यांनी तर आभार रवींद्र मोतीराम महाले यांनी मानले.