शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शेतक:यांच्या खात्यावर पडली भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसानग्रस्त 10 हजार शेतक:यांपैकी 3 हजार शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसानग्रस्त 10 हजार शेतक:यांपैकी 3 हजार शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आह़े महसूल प्रशासनाने शेतक:यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली आह़े उर्वरित दुस:या टप्प्यातील भरपाईचा प्रस्ताव प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठवला आह़े  ऑक्टोबर महिन्यात क्यार व महा या दोन चक्री वादळांमुळे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून काढणीवर आलेल्या खरीप पिकांसह कापूस, मिरची, केळी, पपई, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले होत़े एकूण 5 हजार 818 हेक्टरवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात 10 हजार 885 बाधित शेतक:यांसाठी 3 कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्त यांच्याकडे नोंदवली होती़ प्रस्तावानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रासाठी 8 तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर झाली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होत़े या अनुदानाचे वितरण 99 टक्के पूर्ण झाले असून  त्यानुसार पाच तालुक्यांमध्ये रकमेचे वितरण झाले आह़े उर्वरित सात हजार शेतक:यांना अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु राहणार असून दोन कोटी रुपयांचा हा निधी नेमका कधी मिळणार याकडे शेतक:यांचे लक्ष लागून राहणार आह़े 

नंदुरबार जिल्हा प्रशासनाने 3 हजार 152 शेतक:यांच्या खात्यावर 30 नोव्हेंबर रोजी 1 कोटी 13 लाख 56 हजार रुपयांचे वितरण केले आह़े यात नंदुरबार तालुक्यातील 78 शेतक:यांना 4 लाख 41 हजार, नवापुर तालुक्यात 1 हजार 550, शहादा 509, धडगाव तालुक्यातील 293 शेतक:यांना प्रत्येकी 27 लाख 21 हजार तर अक्कलकुवा तालुक्यातील 711 शेतक:यांना 27 लाख 19 हजार रुपयांची भरपाई वितरीत करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यातील 11 बाधित शेतक:यांच्या खात्यावर 33 हजार रुपयांच्या रकमेचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात 78, नवापुर 1 हजार 593, शहादा 2 हजार 68, तळोदा 8, अक्कलकुव 3 हजार 965 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांच्या पिकांचे नुकसान झाले होत़े एकूण 10 हजार 885 शेतक:यांचे नुकसान झाल्यानंतर त्यासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम दिली होती़ दुस:या टप्प्यात 7 हजार 733 शेतक:यांना 2 कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित असून ती नेमकी कधी मिळणार, याबाब प्रशासनाकडेही ठोस अशी माहिती नाही़ परंतू ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आह़े 

प्रशासनाकडून हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे 3 हजार 144 शेतक:यांना 1 कोटी 12 लाख 86 हजार 240 रुपयांचे वाटप केले आहेत़ तर बागायत क्षेत्रात 18 हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे आठ शेतक:यांना 72 हजार रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आह़े हे सर्व आठ शेतकरी शहादा तालुक्यातील आहेत़ तर कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी हे सर्वच तालुक्यातून आहेत़ दुस:या टप्प्यातील रकमेतही बागायत आणि कोरडवाहू अशा बाधित शेतक:यांना मदत देण्याची कारवाई होणार आह़े शनिवारी शेतक:यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे त्यांना सोमवारी सकाळपासून काढता येणे शक्य होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आह़े