शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात जीप व कार अपघातात तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  वशहरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक धुळे-सुरत महामार्गाच्या वळणावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  वशहरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक धुळे-सुरत महामार्गाच्या वळणावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.प्रत्यक्षादर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जीप (क्रमांक एम.एच.१८ बीसी ५१५८) धुळ्याकडून सुरतकडे जात असताना नवापूर शहरातील कार (क्रमांक एम.एच.१८ डीएम ८४९) जुन्या आरटीओकडे रिलायन्स पेट्रोल पंपाकडे येत असताना जीप व कारची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जीपमध्ये एकूण आठ-दहा प्रवाशी होते. ते साक्री तालुक्यातील आयने येथून उत्तरकार्याचा कार्यक्रम आटोपून सुरत येथे जात होते. यात महिलांची संख्याही मोठी होती. नवापूर शहरातील कारमध्ये दोन प्रवाशी होते. कारमधील चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे तर जीपमधील दोन-तीन प्रवाशांना हातापायाला व डोक्याला मार लागला आहे. दोन्ही वाहनातील दोन-तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ते खाजगी रुग्णालयात उपचार करून रवाना झाले आहेत. दोन्ही वाहन चालकांना नवापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी नातेवाईकांनीही गर्दी केली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. गंभीर दुखापतही झाली नाही. धुळे-सुरत महामार्गावरील धोकेदायक वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करताना महामार्गावरील धोकेदायक वळण,   खोल गेलेल्या साईडपट्ट्या, नादुरुस्त रस्ते, कठडे नसलेले पूल यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.