मोहिदा येथील कोविड कक्षात तीन दिवसात ५० ऑक्सिजनयुक्त बेड सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:48+5:302021-04-08T04:30:48+5:30

तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा, मंदाणे, म्हसावद, पाडळदे या ...

In three days, 50 oxygen beds will be started in the Kovid room at Mohida | मोहिदा येथील कोविड कक्षात तीन दिवसात ५० ऑक्सिजनयुक्त बेड सुरू होणार

मोहिदा येथील कोविड कक्षात तीन दिवसात ५० ऑक्सिजनयुक्त बेड सुरू होणार

तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा, मंदाणे, म्हसावद, पाडळदे या आठवडे बाजार भरणाऱ्या व मोठ्या गावांमध्ये रुग्ण व मृत्यूसंख्या वाढल्याने ग्रामीण भागातील सर्व डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. ज्या गावाला रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावातील रुग्णांना इतर ठिकाणी उपचारासाठी न नेता त्याचठिकाणी जागेवर उपचार करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. औषधी तेथेच पुरवली जातात. यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र वैद्यकीय मोबाईल वाहन ग्रामीण भागासाठी दिले आहे. त्यात डॉक्टर्स व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी सूचनाही दिल्या आहेत. तपासणीही त्याच गावात करण्याची सोय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांनी न घाबरता उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: In three days, 50 oxygen beds will be started in the Kovid room at Mohida