शहादा येथे हॅाटेल फोडून चोरट्यांनी केली दारू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:38 IST2020-10-27T12:38:18+5:302020-10-27T12:38:26+5:30

नंदुरबार : चोरट्यांनी हॅाटेल फोडून ३२हजारांची दारू व रोख रक्कम असा एकुण ५६ हजार ६००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत ...

Thieves broke into a hotel at Shahada and stole liquor | शहादा येथे हॅाटेल फोडून चोरट्यांनी केली दारू लंपास

शहादा येथे हॅाटेल फोडून चोरट्यांनी केली दारू लंपास

नंदुरबार : चोरट्यांनी हॅाटेल फोडून ३२हजारांची दारू व रोख रक्कम असा एकुण ५६ हजार ६००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहादा येथील हॅाटेल तनिष्का २४ रोजी रात्री फोडली. त्यातून चोरट्यांनी ३२हजार १६० रुपयांची विदेशी दारू,२० हजार रुपये रोख तसेच साडेचार हजार रुपयांचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ऐवज चोरून नेला. याबाबत संजय तुमडू चौधरी यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जितेंद्र ईशी करीत आहे. 

Web Title: Thieves broke into a hotel at Shahada and stole liquor