उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज होईल गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:41+5:302021-07-05T04:19:41+5:30

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, सोमवारी (दि.३ जुलै) शेवटची मुदत असल्याने ...

There will be a crowd today to file nominations | उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज होईल गर्दी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज होईल गर्दी

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, सोमवारी (दि.३ जुलै) शेवटची मुदत असल्याने नंदुरबार व शहादा येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. पाच दिवसांत केवळ चार गटांत तीन उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. पंचायत समिती गणासाठी एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेेले नाहीत. महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाचे सूत्र कसे आणि कोणते राहील याबाबत अद्याप निश्चितता नाही.

भाजपने मात्र सर्वच ठिकाणी उमेदवार देण्याचे निश्चित केले असून, काही ठिकाणी उमेदवार बदलले जात आहेत. त्याचे प्रत्यंतर कोळदा आणि खापर गटातून दिसून आले आहे. नंदुरबार तालुक्यात पाच गट असून, त्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला कोणते गट मिळतात याकडे लक्ष लागून आहे.

उमेदवारी अर्जांची उद्या, मंगळवार, ६ जुलैला छाननी होणार आहे. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांची सुनावणीदेखील आहे. त्यामुळे निवडणूक रद्द होते की घेतली जाते याकडेदेखील राजकीय पक्षांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: There will be a crowd today to file nominations