33 गावातील अनेक कुटूंबे बुडीताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:21 PM2019-09-18T12:21:22+5:302019-09-18T12:21:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे ...

There were many families in the village under Budita | 33 गावातील अनेक कुटूंबे बुडीताखाली

33 गावातील अनेक कुटूंबे बुडीताखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे घर, शेती बुडीतात जात आहे. अनेकांना विस्थापीत होण्याची वेळ आली असतांना प्रशासन ढिम्म आहे. बुडीतांचे पंचनामे करून तातडीने जे बाधीत घोषीत व्हावयचे असतील त्यांना तातडीने घोषीत करावे या मागणीसाठी नर्मदा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिका:यांशी चर्चेनंतर निवेदन देण्यात आले.
सरदार सरोवर प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे राज्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील 33 गावांमधील स्थिती विदारक झाली आहे. जे कुटूंब अद्यापही बुडीत क्षेत्रात आहेत त्यांची स्थिती विदारक आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिका:यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
यावेळी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरदार सरोवर पुर्ण क्षमतेने भरण्यास मंजुरी देणे हा विरोधाभास व राजकीय कारस्थानाचा भाग दिसून येतो. यापूर्वी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 15 ऑक्टोबर र्पयत धरण पुर्ण संचय पातळीर्पयत म्हणजेच 138.68 मिटर एवढे भरणे अपेक्षीत होते. यापूर्वी दिलेल्या निवेदनातही याबाबत सुचित करण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही. पाणी पातळी 122 मिटर र्पयत ठेवण्यासाठी संबधीत विभागाला अवगत करावे असे ठरलेले असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले. बुडीतात आलेली घरे, शेती याबाबत उपाययोजना कराव्या व बुडीतांचे पंचनामे करावे. प्रकल्पबाधीतांसाठी जमीन खरदेची प्रक्रिया राबवावी. वेळापत्रक लावून सिमांकन व भू-अभिलेख तयार करण्याची कामगिरी पुढे न्यावी. ज्या प्रकल्पबाधीतांची घरे, जमिनी 138.68 च्या खाली आजही आहेत व जे घोषीत नाहीत त्यांना तात्काळ घोषीत करून त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा. भूसंपादन, सिंचनसुविधा, घरप्लॉट देणे, सिमांकन, सातबारा  आदी पुनर्वसनाची कामे गतीने पुढे जाणे अपेक्षीत होते ते मात्र झाले नाही. ज्यांची घरे बुडाली त्यांना तात्काळ तात्पुरते निवारे बांधून देणे नर्मदा विकास विभागाचे काम आहे ते झालेले नाही. मणिबेली येथील नर्मदा जीवन शाळा पाण्याने वेढली गेली आहे. सर्वच 33 गावे पाण्याखाली गेल्याने बाधितांना खाण्यास अन्न नाही, राहण्यास जागा नाही. सरकारी यंत्रणा केवळ दौरे करण्यात व्यस्त असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.
जिल्हाधिका:यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ओरसिंग पटले, किरसिंग वसावे किर्ता वसावे, नुरजी वसावे, चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते. 
नर्मदा जीवन शाळेला देखील पाण्याचा वेढा पडला आहे. विषारी सर्प, मगरी आणि इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका विद्याथ्र्याना आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना आता या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शिक्षणावरही त्यांचा परिणाम होत आहे. यावेळी जीवन शाळेतील विद्यार्थी देखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांनी आदिवासी भाषेत गाणी गात लक्ष वेधले.
 

Web Title: There were many families in the village under Budita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.