शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा बहाणा आणि वाळू उपसा होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होऊनही त्यातून वाळू उपसा करण्यास परवानगी देत नाही, आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर परराज्यातील ...

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होऊनही त्यातून वाळू उपसा करण्यास परवानगी देत नाही, आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर परराज्यातील वाळूची बिनधिक्कत वाहतूक होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अशा वाहतुकीवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील तीन वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. त्यात तापीवरील तिन्ही वाळू घाटांचा समावेश आहे. त्यात टेंभा, ता.शहादा, कौठळ, ता.शहादा व कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा, ता. शहादा या वाळू घाटांचा समावेश आहे. त्यापैकी टेंभा येथील वाळू घाटाचा लिलाव पहिल्या फेरीत झाला. त्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा घेतलेल्या या घाटातून मात्र प्रशासन वाळू उपसा करण्यास परवानगीच देत नसल्याची स्थिती आहे. त्या ठिकाणी पाणी असल्यामुळे वाळू उपसा करता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. या ठिकाणी जर पाणी राहत होते व राहणार होते तर या वाळू घाटाचा लिलावच का करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता गेल्या महिन्यात दुसऱ्या वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला. त्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. गेल्या आठवड्यात तिसऱ्या वाळू घाटासाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे.

जिल्ह्यात आहे त्या वाळू घाटातून उपशाला परवानगी दिली जात नसताना दुसरीकडे गुजरातमधील वाळू जिल्ह्यातून सर्रास जात आहे. शिवाय त्याचा साठाही होत आहे. त्याकडे प्रशासनाने मात्र कानाडोळा केला आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे फावले आहे.

टेंभा, ता.शहादा येथील वाळू घाटात पाणी असल्यामुळे या ठिकाणातून वाळू उपसा करता येत नाही. हा घाट कोरडा झाल्यावर लागलीच त्यातून वाळू उपशाला परवानगी दिली जाईल. दुसऱ्या घाटाची ठेकेदाराला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या घाटाची लवकरच लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

-रोहिणी चव्हाण,

उपजिल्हाधिकारी,

गौण खनिज विभाग, नंदुरबार.