शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टेक्स्टाईल व फूड इंडस्ट्रीजला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:36 IST

संडे स्पेशल मुलाखत नंदुरबार व नवापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या विकासाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू आहे. - महेंद्र पटेल, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्ह्यात कृषीमालावर आधारीत उद्योगांना चांगली संधी असून त्यासाठी तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे असे मत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यासन विभाग तीनचे प्रादेशिक अधिकारी महेंद्र दशरथ पटेल यांनी व्यक्त केले. महेंद्र पटेल हे मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर, ता.नंदुरबार येथील रहिवासी असून नुकतीच त्यांना मुंबई येथे प्रादेशिक अधिकारी पदावर बढती मिळाली आहे. उत्तर महाराष्टÑातील पाच जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीं त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात.नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आज कुठल्या स्थितीत आहेत?नंदुरबार जिल्ह्यात सध्या नवापूर आणि नंदुरबार या दोनच ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाचे काम सुरू आहे. त्यापैकी नवापूर येथील ६४ हेक्टर क्षेत्रातील औद्योगिक वसाहत विकसीत करण्यात आली असून तेथे भुखंडाचे वाटप होऊन काही उद्योगही सुरू झाले आहेत. या ठिकाणी औद्योगिक विकासाला मोठा वाव असल्याने तेथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरणासाठी पुन्हा १९१ हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. तर नंदुरबार येथील भालेर शिवारात २८५ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी विकासाचे काम सुरू आहे. तेथे रस्ते व इतर कामे झाले असून भुखंड वितरणालाही सुरुवात झाली आहे. लवकरच या कामाला गती येणार आहे.जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या एमआयडीसी प्रस्तावांचे काय?जिल्ह्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन्यासंदर्भातील प्रस्ताव तयार होणे अपेक्षीत आहे. त्यासाठी जर स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास निश्चित तेथेही एमआयडीसी होऊ शकते. शहाद्यात सिंचीत जमीन आहे. औद्योगिक वसाहतीसाठी मुरबाड व खडकाळ जमीन आवश्यक असते.नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासनाच्या मोठ्या सवलती आहेत. त्यामुळे तरुण उद्योजकांनी उद्योग स्थापण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यात दळणवळण, पाणी व इतर सुविधा देखील असल्याने उद्योग विकासाला पोषक वातावरण आहे.नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कला वाव आहे. त्यामुळे नंदुरबारच्या औद्योगिक वसाहतीतील १०० एकर जमीन त्यासाठी राखीव आहे. नवापूर येथे देखील अनेक टेक्स्टाईल उद्योग सुरू झाले आहेत. गुजरातच्या सिमेवर असल्याने नवापूरलाही औद्योगिक विकासासाठी चांगली संधी आहे. ते लक्षात घेवूनच तेथील एमआयडीसी विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात मिरची, सोयाबीन, कडधान्याचे पीकं मोठ्या प्रमाणावर घेतली जात असल्याने फूड इंडस्ट्रिजचा हब होऊ शकतो.