शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

लसीकरणाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची ...

लसीकरणाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून तेथेच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार मंजुळा गावीत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण, दुर्गम-अतिदुर्गम भागातही चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. सध्या कोविडचा धोका वाढल्याने लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही आपली कळकळीची विनंती आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. राज्यात नव्या स्ट्रेनचे रुग्ण नसल्याचे सांगून ते म्हणाले, यासंदर्भात सगळीकडे तपासणी करण्यात आली असून अजून तरी नवा स्ट्रेन आढळून आलेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरण घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून, ‘मी लस घेतली आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे, घाबरू नका, लस घ्या...’ या शब्दात संवाद साधला. तसेच ज्यांनी लस घेतली अशा नागरिकांशीही संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.