शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर सीमा नाक्यावर ई-पास व कोरोना अहवाल शिवाय आंतरराज्यात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

कोरोनासदृश परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातून प्रवास ...

कोरोनासदृश परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातून प्रवास करताना मुभा देण्यात आली असून, परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी पास व कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी नवापुर सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य, महसूूल आणि पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांस पास अनिवार्य करण्यात आली आहे. विनापास वाहनधारकांची वाहने परत गुजरात राज्यात रवाना केली जात आहे. तसेच गुजरात राज्यात जाण्यासाठी नवापूर सीमा तपासणी नाक्यावर वाहनचालकांसह प्रवाशांची कोरोना रॅपिड ॲटिंजन तपासणी केली जात आहे.

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांची तपासणी उच्छल येथील शिबिरात करण्यात येत आहे. त्यासाठी गुजरात प्रशासनतर्फे आरोग्य कर्मचारी व पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात जाण्यासाठी अनुमती दिली जात आहे. अथवा गुजरात प्रशासन वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी परराज्यात जाण्यासाठी कोरोना अहवाल व ई- पास बाळगणे गरजेचे आहे. गुजरात व महाराष्ट्र आंतरराज्यात शेतीव्यवसायासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडून पास प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी पाससाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. तसेच ज्या कामाकरिता प्रवास करणार आहेत, पास असणे आवश्यक आहे. नातेवाईकाचे अंत्यसंस्कारासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पास आवश्यक असून त्यासाठी ओळखपत्र आणि आर.टी.पी.सी.आर अहवाल आवश्यक राहणार आहे. तसेच आर.टी.पी.सी.आर अहवाल नसल्यास सीमेवर रॅपीड अँटीजन चाचणी शिबिरात तपासणी करणे अनिवार्य आहे. तसेच वैद्यकीय उपचार घेण्याकरिता व प्रवासासाठी ओळखपत्र व वैद्यकीय दाखला आवश्यक असेल, असे उपजिल्हाधिकारी तथा कोविड पास वितरण कक्षाचे एस. एस .मोरे यांनी कळविले आहे.

अत्यावश्यक बाबीसाठी पासची सक्ती नाही

लोकसेवा आयोग व शैक्षणिक परीक्षांचे परीक्षार्थीं, शैक्षणिक परीक्षा कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना पास आवश्यक नसून परीक्षार्थींनी परीक्षेचे हॉल तिकीट जवळ बाळगणे आवश्यक असून संबंधित अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. सर्व शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा, बँकेचे व्यवहार सुरू राहणार असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे असून तपासणी यंत्रणेने विचारल्यास दाखवणे बंधनकारक राहील. वृत्तपत्र वितरण व छपाईस मुभा देण्यात आली असून मालवाहतूक आणि गॅस वितरणासाठी वेगळ्या पासची आवश्यकता नाही.