शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने सुरु झालेल्या कोविड केअर सेंटर्सच्या फायर ऑडिटबाबत प्रशासनातच दिसतोय संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांना अधिक चांगले उपचार देता यावेत यासाठी शासकीय इमारती अधिग्रहीत करुन कोविड केअर सेंटर्स ...

नंदुरबार : आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांना अधिक चांगले उपचार देता यावेत यासाठी शासकीय इमारती अधिग्रहीत करुन कोविड केअर सेंटर्स सुरु केले आहेत. परंतू या इमारतींचे फायर ऑडिट झाले किंवा कसे याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. यातून प्रशासनात संभ्रम असून मुंबईच्या दुर्घटनेनंतर या इमारतींच्या तपासणी गरज आहे.

नंदुरबार शहरात दोन, शहादा तालुक्यातील मोहिदा, नवापूर आणि तळोदा तालुक्यातील सलसाडी या पाच ठिकाणी सध्या शासकीय कोविड केअर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. नंदुरबार शहरातील एकलव्य आणि महिला रुग्णालय या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक बेडची व्यवस्था असून उर्वरित ठिकाणीही रुग्ण आहेत.

नंदुरबार शहरातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या इमारतीत पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु झाले आहे. ही इमारत आदिवासी विकास विभागाची असून याठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेले महिला रुग्णालय हे गेल्या काही महिन्यांपासून सुरु झाले आहे. या इमारतीचे बांधकाम करुन त्याठिकाणी तातडीने कोविड केअर सेंटर सुरु झाले. याठिकाणी सर्व बेड हे ऑक्सिजन यंत्रणेसह आहेत.

मोहिदा ता. शहादा येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु झाले आहेत. याठिकाणी सर्व सोयी सुविधा असल्याचे सांगण्यात येते. परंतू फायर ऑडिटबाबत मात्र माहिती दिली जात नाही.

एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये चांगल्या प्रकारे सुविधा आहेत. याठिकाणी ऑक्सिजन बेडही होणार आहेत. शहादा येथेही ऑक्सिजन बेड वाढवले जात आहेत. या इमारती ह्या सुरक्षित आहेत.

-डाॅ. एन.डी.बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.