शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांची आंदोलनासाठी सामूहिक रजा परंतु शासनाच्या तिजोरीतून डिझेल झाले वजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. घटनेचा निषेध ...

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले. मंगळवारी हे आंदोलन करण्यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात तहसीलदार व नायब तहसीलदार यांना जिल्हा खजिन निधीतून सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, विविध मागण्यांही निवेदनातून राज्य शासनाकडे करण्यात आल्या. एकीकडे हे आंदोलन करण्यासाठी सामूहिक रजा घेणाऱ्या तहसीलदार व नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहाेचण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर केला. ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी असल्याचे दिसून येत होते. शासकीय नियमांनुसार रजेवर असलेल्या अधिकारी हे शासकीय वाहनांचा उपयोग करू शकत नसल्याची माहिती आहे. त्यातून सामूहिक रजेवर असल्याने सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याची अपेक्षा होती परंतु तसे न हाेता सर्वच वाहनांचा उपयोग हा आंदोलनासाठी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराची चाैकशी होऊन अधिकारी डिझेलचा खर्च परत करतील किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे.

चालकांच्या एकदिवसीय वेतनाचाही प्रश्न

दरम्यान, तहसीलदारांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्यासाठी शासकीय सेवक असलेल्या वाहनचालकांचा उपयोग झाला. अधिकारी सुटीवर आणि चालक कामावर असा हा प्रकार होता. यातून चालकाला नेमक्या कोणत्या कर्तव्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आणले गेले. याची चर्चा महसूली वर्तुळात सुरू होती. या चालकांचे एका दिवसाचे वेतन नेमके कसे होणार याकडे लक्ष लागून आहे.