शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आयत्या वेळच्या विषयांवर तळोदा पालिका बैठक गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा नगरपालिकेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा निकृष्ट सौर दिवे, नामकरण व घरकुलाच्या आयत्या विषयांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा नगरपालिकेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा निकृष्ट सौर दिवे, नामकरण व घरकुलाच्या आयत्या विषयांवर विरोधकांनी गाजवली. एरवी १५, २० मिनिटात आटोपणारी सभा तीन वर्षात प्रथमच तब्बल दीड तास गाजली. सौर दिव्यांच्या प्रश्नांवर विरोधक व  सत्ताधारी एकावटल्याचे चित्र दिसून आले होते.           तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. या सभेत शहर विकासाचे वेगवेगळे ४७ विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. यात पालिकेत ऊर्जा संवर्धनासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणे, घनकचरा व्यवसथापनासाठी नवीन निविदा काढणे, पालिका इमारत, मोकळ्या जागांवर रेन हार्वेस्टिंग उभारणे, विविध ठिकाणच्या उच्च दाब वीज वाहिन्या स्थलांतरित करणे, ठिकठिकाणी गटारी बांधणे, नवीन वसाहतीमध्ये मोकळ्या जागा विकसित करणे, व्यापारी संकुलांना थोर नेत्यांचे नामकरण करणे, अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होता. या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तथापि आयत्यावेळी घेण्यात आलेल्या विषयांवर पालिकेतील विरोधकांनी चांगलीच गरमागरम चर्चा केली. नगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व डिव्हायडरचे काम हाती घेतले आहे. या विषयावर विरोधी नगरसेवकांबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कारण हे सौर दिवे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. चार तासदेखील चालत नाही. त्यामुळे ठेकेदाराचे बिले काढू नये. त्याचबरोबर विरोधी नगरसेवकांनी पालिकेच्या मालकीच्या इमारती अथवा जलकुंभवर शहरातील प्रमुख हस्तींचे की, ज्यांचे मोठे योगदान आहे अशांची नाव देण्याचे विनंती अथवा निवेदन दिले जाते तेव्हा त्याचा विषय पत्रिकेवर घेतला जात नाही. यावर तीव्र आक्षेप घेत त्यावरदेखील कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या शिवाय शहरातील घरकूल योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून संस्थेमार्फत लाभार्थीना मार्गदर्शन केलेले असताना कागदपत्रासाठी त्यांची अडवणूक केली जात असते. या प्रकरणी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची सूचना मांडली. शहादा रस्त्यावरील जिमचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. स्वखर्चातून हे साहित्य उपस्थित करून दिलेले असताना हा विषय घेण्यात आल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तथापि हे साहित्य पुरेसे पडत नसल्यामुळे याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस  विस्तारीत जिमचे साहित्य घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान शहरातील आदिवासींची संख्या मोठी आहे. हे आदिवासी शासनाच्या घरकूल याेजनेपासून वंचित राहतात. त्यांनाही घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विरोधकांनी सूचना केली. या सभेत काँग्रेसचे    प्रतोद संजय माळी, गट नेते गौरव वाणी, भास्कर मराठे, सुभाष चौधरी, रामानंद ठाकरे, सुरेश ठाकरे, योगेश पाडवी, अंबिका शेंडे, शोभाबाई भोई, सयाना उदासी, कल्पना पाडवी, बेबीबई पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, हेमलाल मगरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी सपना वसावे यांनी केले.