अश्व नृत्य स्पर्धेत ‘सूर्याभाई’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:44 IST2019-12-25T12:44:52+5:302019-12-25T12:44:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये मंगळवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. ...

'Suryabhai' bet on horse dance competition | अश्व नृत्य स्पर्धेत ‘सूर्याभाई’ची बाजी

अश्व नृत्य स्पर्धेत ‘सूर्याभाई’ची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये मंगळवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २५ स्पर्धक घोड्यांनी सहभाग नोंदवला. अश्व नृत्य पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या घोडे मालकांना सन्मानीत करण्यात आले. दरम्यान, बुधवारी या स्पर्धांचा अश्व दौड स्पर्धेने समारोप होणार आहे.
चेतक फेस्टीवल समितीतर्फे येथे विविध अश्व स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी अश्व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात विलास मसिह यांची ‘सूर्याभाई’ घोड्याने प्रथम, श्रवणसिंग वाघेला यांची ‘जानकी’ घोडी द्वितीय तर तृतीय क्रमांक आर.के. खान यांच्या ‘नवाब’ या घोड्याने पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस ताराचंद धर्मा चौधरी यांच्या ‘सुलतान’ घोड्याला देण्यात आले. विजेत्या घोडे मालकांना अनुक्रमे ७१, ५१ व ३१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
परीक्षक म्हणून जयपालसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल, सचिन गवळी, तुषार पाटील यांनी काम पाहिले. विजेत्यांना इंदूर येथील प्रदीप सिंह, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी महेंद्र गिरासे, भरत धोबी, विवेक वाडिले, एकनाथ गिरासे, अजय पाटील, विनोद तावडे, विलास चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले.
मंगळवारी झालेल्या अश्व नृत्य स्पर्धेत सहभागी घोड्यांनी नृत्याचा अविष्कार करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ढोल व ताशाच्या गजरात अश्वांनी नृत्य सादर करीत अनेक कसरतीही सादर केल्या. बुधवारी अश्व दौड स्पर्धा होऊन अश्व स्पर्धांचा समारोप होणार आहे.

Web Title: 'Suryabhai' bet on horse dance competition