शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण- घरोघरी, दारोदारी फिरतांना कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

नंदुरबार : शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचे काम जिल्हाभरात ९४ पथकांद्वारे सुरू आहे. यासाठी सर्वच केंद्रांवर काम सुरू करण्यात आले ...

नंदुरबार : शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचे काम जिल्हाभरात ९४ पथकांद्वारे सुरू आहे. यासाठी सर्वच केंद्रांवर काम सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी घरोघरी आणि दारोदारी जातांना कोरोनाची भीती या पथकांना सतावत आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पथकातील कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असल्याचे चित्र आहे. विहित मुदतीतच सर्वेक्षण पूर्ण करण्याचा दबाव पथकांवर आहे.

नंदुरबार जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मजूर स्थलांतर, रोजगारासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणारे कुटुंब यासह इतर कारणे त्याला कारणीभूत आहेत. याशिवाय यंदा शाळाच सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळेदेखील शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी राहण्याची शक्यता आहे. शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचारी भीतीच्या वातावरणातच ही मोहीम राबवित आहेत. आपल्यासह सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाणाऱ्यांचीही काळजी त्यांना घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. निर्धारित वेळेत त्यांना हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे.

यंदा शाळा बंद असल्याने व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने ही मोहीम रद्द करावी लागेल, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू होती. त्यामुळे अनेकांनी कामच सुरू केले नसल्याचे शुक्रवारपर्यंत दिसून आले. परंतु शासनाने मोहीम सुरूच राहणार असून रद्दचा विचार नाही. निर्धारीत वेळेत पथकांनी आपले काम पूर्ण करावे, असे स्पष्ट केल्याने शनिवारपासून गती मिळणार आहे.

१ मार्चपासून हे सर्वेक्षण सुरू होणार असून १० मार्च रोजी त्याचा समारोप होणार आहे. मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामधील जन्म मृत्यू नोंदींचा वापर प्रामुख्याने करण्यात येणार आहे. कुटुंब सर्वेक्षण करताना तात्पुरते स्थलांतर करणारी कुटुंबे व मूूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतर होऊन आलेले कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या ठिकाणी होईल पाहणी...

०६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेताना जिल्हा, तालुका, केंद्र, वाॅर्ड, गाव, अशा विविध स्तरावर स्थापन करण्यास सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वेक्षण हे प्रत्येक गावात होणार आहे. वाड्यावस्त्या, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, झोपडपट्टी, लोककलावंतांची वस्ती, फूटपाथ, गुऱ्हाळघर, साखर कारखाने, विटभट्ट्या, दगडखाण, मोठे बांधकामे, शेत शिवार, ऊसतोड कामगारांची वस्ती, स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

वेळेत पूर्ण करणार...

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणाचे काम जिल्ह्यात वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी डॅा.राहुल चौधरी यांनी व्यक्त केला. सर्व पथकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणाचे काम नियमितपणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.