शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- डीबीटीचा निर्णय रद्द झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:34 IST

आदिवासी विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शैक्षणिक भवितव्याचा सरकारला विचार करायचा असेल तर डीबीटी निर्णय बंद झालीच पाहिजे. -राजेद्र गावीत

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आदिवासींच्या विकासासंदर्भात व त्यांच्या शिक्षणासंदर्भात सरकार अनेक योजना राबवत असले तरी खºया अर्थाने योजनांचा व त्या योजना कशा राबवाव्यात या बाबतचे निर्णय अभ्यास न होताच घेतले जातात. त्यातील एक निर्णय म्हणजे डीबीटीचा. हा निर्णय जेव्हा राज्यातील फडणवीस सरकारने घेतला त्यावेळी देखील आपण त्या निर्णयाला विरोध केला होता. परंतु तो घेतला गेला. आता या निर्णयावर फेरविचार करण्यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू केलेली प्रक्रिया स्वागतार्ह असून डीबीटीचा निर्णय रद्द झालाच पाहिजे अशी आपली स्पष्ट भुमिका असल्याचे प्रतिपादन पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले.
डीबीटी निर्णया संदर्भात आपली भुमिका काय?
डीबीटीचा निर्णय हा पुर्णपणे चुकीचा आहे.कारण विद्यार्थ्यांचा हातात जेंव्हा एकरकमी रक्कम पडते तेव्हा ते खर्च करण्याचे अनेक मार्ग असतात. प्रत्येकाचा दैनंदिन अडीअडचणी असतातच त्यामुळे सरकार जेव्हा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी ती रक्कम देणार तेव्हा ती रक्कम संबधीत विद्यार्थी व पालक दुसºया कामासाठी ते पैसे वापरू शकतात. नव्हेतर गेल्या वर्ष दोन वर्षातील असे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शासनाच्या मुळ हेतूच दूर पडतो. त्यामुळे डीबीटीचा निर्णय रद्द करणे आदिवासींच्या हिताचा ठरणार आहे.
हा निर्णय झाला तेव्हा देखील आपण लोकप्रतिनिधी होता, तेव्हा विरोध केला होता का?
हो निश्चितच, या संदर्भात सर्वप्रथम आपण विरोध दर्शविला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊनही त्या संदर्भात आपली भुमिका मांडली होती. त्या काळातच हा निर्णय रद्द होणे अपेक्षीत होता. पण झाले नाही. त्याला अनेक कारणे असू शकतात. पण आता आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी चांगला निर्णय घेतला असून त्यातून चांगला निर्णय होइल.

आपण स्वत: वसतिगृहात शिक्षण घेतले आहे. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्षपदही भुषविले आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे डीबीटीचा निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे या विषयावर खूप काही वाद न घालता निर्णय रद्द झाला पाहिजे.

डीबीटीचा निर्णयासंदर्भात राज्य शासनाने जी समिती नेमली आहे त्याचे प्रमुखपदी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती केली आहे. ते देखील आदिवासींच्या प्रश्नांवर जाणकार, अनुभवी व अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती चांगले काम करेल व आदिवासींच्या हिताचा निर्णय त्यातून होईल याची आपल्याला खात्री आहे. त्यासाठी त्यांना सर्व संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.