हिमालयाची सातपुड्याच्या दरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:00+5:302021-03-08T04:29:00+5:30

हिमालय दऱ्यासिंग चौधरी (२६) असे मयताचे नाव आहे. हा युवक शनिवारी नेहमीप्रमाणे आपली चहाची हॉटेल बंद करून घरी आल्यावर ...

Suicide in Satpuda valley of Himalayas | हिमालयाची सातपुड्याच्या दरीत आत्महत्या

हिमालयाची सातपुड्याच्या दरीत आत्महत्या

हिमालय दऱ्यासिंग चौधरी (२६) असे मयताचे नाव आहे. हा युवक शनिवारी नेहमीप्रमाणे आपली चहाची हॉटेल बंद करून घरी आल्यावर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास या युवकाने सीताखाई गाठली व जवळील आपल्या मित्राला आत्महत्या करीत असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे सांगितले. तत्काळ या युवकाचे मित्र व नातेवाइकांनी सीताखाई गाठली, परंतु या युवकाने सीताखाईत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. रात्री जास्त उशीर झाल्याने मृत्यू देह बाहेर काढण्यासाठी वन्यप्राण्यांच्या धाकाने तसेच रात्री सीताखाईत उतरण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी मृतदेह रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास खोल दरीत उतरुन दोरीच्या साहाय्याने काढला. तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.सुहास पाटील यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह त्यांचा नातेवाइकांच्या ताब्यात दिला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील बिरारे, हवालदार छोटूलाल पावरा उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वी झाला होता हिमालयाचा विवाह:- तोरणमाळ येथील हिमालय चौधरी या युवकाचा गेल्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. हिमालयाने आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या पत्नी,आई, वडील, बहीण व कुटुंबीयांना मिळताच त्यांनी हंबरडा फोडला होता.

पाच दिवसात दुसरी आत्महत्या:- तोरणमाळ येथील सीताखाईत गेल्या पाच दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या आत्महत्यामुळे तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंट हा सुसाईड पॉईंट बनल्याचे दिसून येत आहे याठिकाणी ठोस अशी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Web Title: Suicide in Satpuda valley of Himalayas