लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील सिलींगपूर शिवारातील शेतातून अडीच एकरातून सव्वा दोन लाखांचा ऊस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े मंदाणा ता़ शहादा येथील पारुबाई मोतीराम जाधव यांच्या मालकीचे सिलींगपूर शिवारातील गट क्रमांक 66/69/1 असे दोन एकर शेत आह़े त्यांनी याठिकाणी ऊसाची लागवड केली होती़ दरम्यान विनोद रणजीत चव्हाण रा़ सिलींगपूर, मकराम समो राठोड रा़ मंदाणा आणि गुजरात राज्यातील खांडसरीचा श्रावण नामक सुपरवायजर अशांनी 12 जुलै रोजी संगनमत करुन पारुबाई यांच्या शेतातील ऊस परस्पर तोडून नेला़ दोन लाख 25 हजार रुपये किंमत असलेल्या ऊसाची विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने पोलीसात धाव घेतली़ पारुबाई यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़
सिलींगपूर शिवारातील अडीच एकरातून ऊस चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:33 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील सिलींगपूर शिवारातील शेतातून अडीच एकरातून सव्वा दोन लाखांचा ऊस चोरीला गेल्याचा प्रकार ...
सिलींगपूर शिवारातील अडीच एकरातून ऊस चोरी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}