उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:20 IST2020-02-04T12:20:00+5:302020-02-04T12:20:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात विनापरवाणगी उघड्यावर मांस विक्री करणाºया एका विक्रेत्यावर प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल ...

Sue meat seller openly | उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात विनापरवाणगी उघड्यावर मांस विक्री करणाºया एका विक्रेत्यावर प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील बागवान गल्ली परिसरात हिदायतउल्ला बिसमिल्ला (६५) रा.बागवान गल्ली यांनी उघड्यावर मांस विक्री सुरू केली होती. यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत तक्रारी करण्यात आल्या. पोलीस नाईक सादिकखान पठाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्याने हिदायतउल्ला यांच्याविरुद्ध विनापरवाना उघड्यावर मांस विक्री करणे व महाराष्टÑ प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी सर्रास मांस विक्री केली जात असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, शहरातील वळण रस्ता आणि रनाळा रस्त्यावर रस्त्याच्या बाजुला मांस विक्रेते घाण टाकत असतात. त्यामुळे या मार्गाने येणाºयाजाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Sue meat seller openly