विषय समिती सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:01 PM2020-01-29T13:01:43+5:302020-01-29T13:02:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसला तीन तर ...

Subject Committee Chairman Selected Unopposed | विषय समिती सभापती निवड बिनविरोध

विषय समिती सभापती निवड बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसला तीन तर एमआयएम व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले. तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला सभापतीपद मिळाले आहे. आजच्या बैठकीत भाजपच्या दहापैकी नऊ नगरसेवकांनी गैरहजर राहणे पसंत केले.
तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत विषय समिती सभापती व सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अर्थ व नियोजन समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, आरोग्य सभापतीपदी वर्षा जोहरी, पाणीपुरवठा सभापतीपदी लक्ष्मण बढे, बांधकाम सभापतीपदी वसीम तेली, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विद्या जमदाळे यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीला मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, काँग्रेस व एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.
पालिकेत काँग्रेस ११, भारतीय जनता पक्ष १०, एमआयएम चार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. पालिकेत काँग्रेस एमआयएम युती असून गेल्या तीन वर्षापासून सर्व विषय समित्यांवर या युतीचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने पाचही विषय समित्या त्यांच्या ताब्यात होत्या. मात्र तीन वर्षानंतर पहिल्यांदा महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या विद्या जमदाळे यांची निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या सभेला भारतीय जनता पक्षाचे गटनेता आनंदा पाटील यांनी अर्ज भरण्याच्या मुदतीत विषय समिती सदस्य पदासाठी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवली. नंतर बैठकीतून काढता पाय घेतला तर उर्वरित आठ नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिले. सर्व विषय समित्यांचे सभापती व सदस्य यांची बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व काँग्रेसचे गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी नवनियुक्त सभापतींचे पुष्पहार देऊन अभिनंदन केले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा परिषदेच्या सभापती जयश्री पाटील यांनीही अभिनंदन केले. तत्पूर्वी डीजेच्या तालावर नवनिर्वाचित सभापती व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत महात्मा गांधी पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विषय समित्यांचे सभापती व सदस्य
स्थायी समिती- सभापती मोतीलाल फकीरा पाटील, रेखाबाई भानुदास चौधरी, वसीम सलीम तेली, उषाबाई अरविंद कुवर, वर्षा राजेंद्र जोहरी, लक्ष्मण नथ्थू बढे, विद्या जितेंद्र जमदाळे, अन्सारी अखलाक अह.रहीम, रिमा विनायक पवार, पिंंजारी वाहीद शे.रशीद.
सार्वजनिक बांधकाम समिती- सभापती तेली वसीम सलिम, संगीता वसंत मंदील, पठाण शहेरनाज अजहरखान, प्रशांत विक्रम निकुंभे, संजय गोरख साठे, संदीप शंकर पाटील, सुमनबाई विश्राम पवार.
शिक्षण समिती- सभापती उषाबाई अरविंद कुवर, ज्योती एकनाथ नाईक, संगीता योगेश चौधरी, संजय गोरख साठे, आनंदा पांंडू पाटील, संदीप शंकर पाटील, सैयद सायराबी लियाकतअली.
सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय समिती - सभापती वर्षा राजेंंद्र जोहरी, कुरेशी शमीमबी शे.हकीम, ज्योती एकनाथ नाईक, योगीता संतोष वाल्हे, अन्सारी सईदाबी साजीद, अनिता निलेश पाटील, सैयद सायराबी लियाकतअली.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- सभापती लक्ष्मण नथ्थू बढे, सदस्य ज्योती एकनाथ नाईक, संगीता वसंत मंदील, आनंदा पांडू पाटील, प्रशांंत विक्रम निकुंभे, कुरेशी रियाज अहमद अ.लतीफ, सैयद सायराबी लियाकतअली.
नियोजन व विकास समिती- सभापती रेखाबाई भानुदास चौधरी, सदस्य पठाण शहेरनाज अजहरखान, सुमनबाई विश्राम पवार, शे.ईकबाल शे.सलीम, अन्सारी सईदाबी साजिद, अनिता निलेश पाटील, पिंंजारी जाहेदाबी रहीम.
महिला व बाल कल्याण समिती- सभापती विद्या जितेंद्र जमदाळे, सदस्य कुरेशी शमीमबी शे.हकीम, सुमनबाई विश्राम पवार, पठाण शहेरनाज अजहरखान, रेखा भरत पटेल, योगीता संतोष वाल्हे, पिंंजारी जाहेदाबी शे.रहीम.

Web Title: Subject Committee Chairman Selected Unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.