शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणाने बिघडवले विद्यार्थ्यांचे हस्ताक्षरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन आणि ऑनलाइन शिक्षण याचे शैक्षणिक दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या आहेत. ...

नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन आणि ऑनलाइन शिक्षण याचे शैक्षणिक दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या आहेत. त्यात मुख्यत: लिखाणाचा सराव कमी झाला व त्यामुळे हस्ताक्षरं खराब झाल्याचे चित्र आहे, आता बोर्डाचे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

ॲानलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम तर झालाच शिवाय त्यांचे हस्ताक्षरं खराब होण्यावरदेखील झाला आहे. देण्यात येणारा स्वाध्याय हा कमी होता. शिवाय पेपर सोडविण्याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता होती. त्यामुळे लिखाणाची सवय कमी झाली. शाळेत असताना शिक्षक तोंडी सांगून विद्यार्थी भराभर लिहीत असत. शिवाय फळ्यावर लिहिलेलेदेखील ठरावीक वेळेत लिहावे लागत असे. निबंध लेखनही होत असे. स्वाध्याय सोडविताना प्रत्येक विषयाचा दिला जात होता. त्यामुळे घरीही लिखाण होत होते. परंतु वर्षभरात असे लिखाण २० टक्क्यावर आल्याने विद्यार्थ्यांची सवय मोडली असून, हस्ताक्षरं खराब झाली आहेत.

n परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवावे.

n हाताच्या पंजाच्या स्नायूचे व्यायाम करणे.

n पेपर सोडविताना किंवा लिखाण करताना उंचीनुसार योग्य टेबल खुर्चीचा वापर करणे.

n दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करावा.

n परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहिणे व खात्री करणे.

n लिखाणासाठी जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे. त्याकरिता पेपर सोडविणे आहे.

n शाळेत आणि घरात अभ्यास करण्याच्या स्थितीमध्ये मोठी तफावत आढळते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार हाताचे काम करताना त्याला आधार मिळण्यासाठी वर्गात जसे बेंच असतात तसे ते घरात असत नाहीत. दोन्ही पाय जमिनीवर टेकतील या पद्धतीने बसणं आणि दोन्ही हाताला आधार मिळेल असा टेबल घेऊन लिखाण करायला बसले तर हातदुखी कमी होऊन अक्षरं सुधारायला मदत होते.