शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त बसमुळे विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना दररोज एसटी बसमधून ये -जा करावी लागते. परंतु राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना दररोज एसटी बसमधून ये -जा करावी लागते. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या या नादुरुस्त बसमुळे चक्क विद्यार्थ्यांनाच बसला धक्का मारावा लागत असल्याचा प्रकार शहादा बस स्थानकात पहावयास मिळाला आहे.शहादा डेपोच्या बसेस खिळखिळ्या झाल्यामुळे विद्यार्थ्यां आपला जीव मुठीत धरून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. याबाबीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थिनींनी केली आहे.तालुक्यात गेल्या दीड महिन्यापूर्वी शहादाहुन मंदाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आल्याने वाहनधारकांना रस्ता अरूंद झाल्यामुळे जीवधोक्यात घालून वाहन चालवावे लागत होते. परंतु या मार्गावर शहादा-शहाणा ही बस रस्त्याच्या खाली उतरल्याने बसची एक बाजू झुकली होती. त्यामुळे बसमधील प्रवाशी विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखून खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. बस जर चांगली राहिली असती तर बस खड्ड्यात झुकली नसती.या सर्व घटना ताज्या असतांनाही शहादा शहरातील बस स्थानकात महामंडळाचा गलथान कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. याबाबीकडे वेळीच महामंडळ कार्यालय शहादाने लक्ष न दिल्यास मोठी दुर्देवी घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.