महिलेचे नाव घेतल्याच्या संशयावरून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:38 IST2019-08-03T12:38:44+5:302019-08-03T12:38:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुन्या दूध डेअरीजवळील महिलेचे नाव घेतल्याच्या संशयावरून  ट्रक चालकाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना ...

Striking on suspicion of naming a woman | महिलेचे नाव घेतल्याच्या संशयावरून बेदम मारहाण

महिलेचे नाव घेतल्याच्या संशयावरून बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुन्या दूध डेअरीजवळील महिलेचे नाव घेतल्याच्या संशयावरून  ट्रक चालकाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी अज्ञात दोघा युवकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल मुन्ना डावर, रा.राडीकलम, ता.पानसेमल हा ट्रक चालक 31 जुलै रोजी दोन वाजता जुन्या दूध डेअरीजवळ एका महिलेचे नाव घेतले म्हणून दोघांनी त्याच ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केली. तेथून त्यांच्या तावडीतून जेमतेम सुटका करून चालकाने ट्रकसह तेथून निघाला. परत दोघांनी दुचाकीवर येवून आपल्या प}ीचे नाव का घेतले म्हणून लाकडी दांडक्याने व हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. 
दोघांच्या तावडीतून डावर याने सुटका करून घेतली. जखमी अवस्थेत तो तेथून निघाला. दुस:या दिवशी अर्थात 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी अनिल डावर याने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनवणे करीत आहे.
 

Web Title: Striking on suspicion of naming a woman