तामिळनाडूत अडकलेल्या मुली परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:41 PM2020-05-24T12:41:48+5:302020-05-24T12:41:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : तामिळनाडू राज्यात रोजगारासाठी गेलेल्या नवापूर तालुक्यातील गावांमधील २० मुली लॉकडाऊनमुळे अडकून होत्या. या मुलींनी ...

The stranded girls returned to Tamil Nadu | तामिळनाडूत अडकलेल्या मुली परतल्या

तामिळनाडूत अडकलेल्या मुली परतल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : तामिळनाडू राज्यात रोजगारासाठी गेलेल्या नवापूर तालुक्यातील गावांमधील २० मुली लॉकडाऊनमुळे अडकून होत्या. या मुलींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावी परत येण्याची मदतीची याचना केली होती. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या अडचणीवर मात करीत शनिवारी विसरवाडी येथे सुखरूप परत आल्या. त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात घेऊन त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील विविध गावातील २० मुली तामिळनाडू राज्यातील पेरूंदुराई जिल्ह्यातील एका मिलमध्ये कामास होत्या. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने कंपनी बंद पडली. या मुलींकडील पैसे संपले, गावाकडे जाण्याचा मार्ग बंद पडला. अशा बिकट अवस्थेमुळे त्यांना मूळ गावी परतायचे होते. मात्र त्यांना लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे गावी येणे शक्य नव्हते. अशातच या तरुणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपच्या आधारे भारतीय ट्रायबल पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.उल्हास वसावे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याकडे पाठपुरावा करून या मुलींना त्यांच्या मूळ गावी परत आणता यावे म्हणून वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची यादी व फार्म भरून देण्यात आले. ही यादी तामिळनाडू राज्यातील जिल्हाधिकारी डॉ.राधाकृष्णन यांना आॅनलाईन चौकशी करून या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारा पाठविण्यात आले. प्रवास करणाºया सर्व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने मुलींना परवानगी देण्यात आली. अखेर सर्व २० मुली व त्यांच्यासोबत ११ मुले बसने तीन दिवसांचा प्रवास करून विसरवाडी येथे सुखरूप पोहोचले. त्यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. या सर्व मुलींची भोजनाची व्यवस्था के.टी. गावीत यांनी केली. आपल्या जिल्ह्यात परत आलेल्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आम्ही आठच महिन्यापूर्वी रोजगारासाठी चेन्नईला गेलो. तेथील भाषा, संस्कृती आहार याचा धड परिचयही झाला नव्हता. अशातच कोरोनाचे संकट आले व लॉकडाऊन झाले. मग पुढचे हाल विचारूच नका... गावाचीसारखी ओढ, पैसे नाहीत, परमुलखात ओळख नाही. अशा अवस्थेत घरच्यांना फोन केला. त्यांनी कोणत्याही जबाबदार पालकांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींना आम्हीही फोन लावला. आश्वासन मिळत होते, मदत करू... पण प्रत्यक्षात काहीच नाही. अशावेळी भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत व डॉ.उल्हास वसावे यांच्याशी संपर्क झाला. सुरूवातीला आम्हाला काही आशा उरली नव्हती. पण अचानक एकेदिवशी चेन्नई चे पोलीस उपायुक्त आमच्याकडे आले आणि आम्हाला सविस्तर परिस्थिती विचारून आमची राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. त्यांच्याकडून कळले की, डॉ.उल्हास वसावे यांचा फोन आणि प्रयत्नांमुळे ते आमच्यापर्यंत पोहोचले होते. या घटनेवरून आमचा विश्वास वाढल्याने आम्ही के.टी. गावीत व डॉ.उल्हास वसावे यांच्याशी सतत संपर्कात राहिलो आणि अवघ्या पाचच दिवसात त्यांच्या प्रयत्नांनी आम्ही आज गावी सुखरूप पोहचलो, अशी प्रतिक्रिया चेन्नईहून परतलेल्या युवक-युवतींच्या को-आॅर्डिनेटर करूणावती गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: The stranded girls returned to Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.