शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

एसटीही आता ‘भरेल तेव्हाच सुटेल़़’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिने बंद असलेली एसटी रडतखडत रस्त्यावर आली आहे़ यानंतर गेल्या १० दिवसांपूर्वीच ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिने बंद असलेली एसटी रडतखडत रस्त्यावर आली आहे़ यानंतर गेल्या १० दिवसांपूर्वीच जिल्हाबाह्य वाहतूकीस परवानगी मिळाली आहे़ परंतु कोरोनाचा धसका प्रवाशात कायम असल्याने एसटीला प्रवाशांची प्रतिक्षा आहे़ परिणामी खाजगी वाहनांप्रमाणे एसटी बसही ‘भरली की चालली’ अशीच झाल्याची स्थिती आहे़
‘लोकमत’ने प्रवाशांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी नंदुरबार बसस्थानकात भेट दिली होती़ यावेळी बसस्थानकात शुुकशुकाट असल्याचे दिसून आले़ स्थानकात उभ्या असलेल्या नाशिक डेपोच्या बसेसमध्ये एखाद दुसरा प्रवासी दिसून आला़ एका सीटवर एकच प्रवासी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच उरला नव्हता़ दुसरीकडे बसस्थानकात चालक आणि वाहक एकमेकांसोबत गप्पा करत असल्याचे दिसून आले़ प्रवासीच नसल्याने नाशिक आणि धुळ्याकडे जाणाऱ्या बसेस थांबून होत्या़ नंदुरबार बसस्थानकावरून सध्या नियमित २६ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत़ यात नाशिक, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, आणि शिरपूर येथील डेपोमधून बसेस स्थानकात येत आहेत़ जिल्हांतर्गत सेवेत नवापूर, शहादा, अक्कलकुवा आणि तळोदा या तालुका मुख्यालयातून थेट बसेस सुरू आहेत़ परंतु यातून प्रवाशांचा प्रतिसाद तुरळक असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे़
लॉकडाऊनपूर्वी १२० बसेस असलेल्या नंदुरबार आगारातून दर दिवशी ६७६ बसफेºया होत होत्या़ यातून ४२ हजार किलोमीटरचा प्रवास दर दिवशी बसेस करत होत्या़ आगाराचे दिवसाचे उत्पन्न हे १४ लाख रूपये होते़ लॉकडाऊननंतर चार महिने बसफेºया बंद राहिल्याने आगाराला महिन्याकाठी ४ कोटी २० लाख तर चार महिन्यात १६ कोटी ८० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ मिशन बिगिन अंतर्गत १८ बसफेºया सुरू करण्यात आल्या होत्या़ यातून ५९९ किलोमीटर प्रवास होवून त्यातून अत्यंत नगण्य असे उत्पन्न एसटीच्या नंदुरबार आगाराला मिळाले होते़ शासनाने जिल्हाबाह्य बसफेºया सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर अडचणी सुटणार अशी अपेक्षा होती़ परंतु प्रवासीच नसल्याने आगाराकडून काही बसेस रद्द केल्या जात आहेत़
४आजघडीस नंदुरबार आगारातून २६ फेºया इतर जिल्ह्यासाठी आणि जिल्हांतर्गत होत असल्याची माहिती दिली गेली़ यात नाशिक ५, धुळे १०, शिरपूर १, पुणे २, तळोदा ३, शहादा ३ तर नवापूर शहरापर्यंत २ बसफेºया केल्या जात आहेत़ बाहेरील आगारात नाशिक, शिरपूर, पाचोरा या तीन आगारातून नियमित बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धुळे आगारातून एकही बस नंदुरबारसाठी अद्याप सोडली जात नसल्याची माहिती दिली गेली आहे़ जिल्हाबाह्य सोडल्या जाणाºया बसेसमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे होणारे हाल थांबले आहेत़ धुळे येथून अनेक कर्मचारी अप-डाऊन करत असल्याची माहिती दिली गेली आहे़ यामुळे सायंकाळी थोडेफार प्रवासी वाढत असल्याची माहिती आगाराने दिली आहे़
४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी बसस्थानकात थर्मल स्कॅनिंग मशीनसह एक कर्मचारी तसेच सॅनेटाझरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले होते़ परंतु बुधवारी बसस्थानकात येणाºया किंवा जाणाºया प्रवाशांची चौकशी करणारेही कोणी दिसून आलेले नाही़ आगारातून बसेस आल्यानंतर किंवा सोडताना सॅनेटाईज केल्या जात असल्याचे तसेच चालक व वाहकांन मास्क आणि सॅनेटायझर वापराची सूचना करण्यात आल्याची माहिती दिली गेली़