शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

एसटी थांबल्याने चारही आगारांचे दररोज ५० लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील एसटीचे चार आगार बंद आहेत़ यामुळे तब्बल ५० लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील एसटीचे चार आगार बंद आहेत़ यामुळे तब्बल ५० लाख रुपयांचे दैनंदिन नुकसान होत आहे़ दरदिवशी चारही आगारातून होणाऱ्या २ हजार बसफेºया बंद असल्याने बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला आहे़कोरोना थोपवण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला आहे़ यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शहरे आणि खेड्या गावांमध्ये शुकशुकाट आहे़ एसटीच्या नंदुरबार, नवापुर, अक्कलकुवा आणि शहादा आगार रविवारपासून बंद आहे़ यामुळे चारही आगारातील दीड हजाराच्या जवळपास कर्मचारी सुटीवर असल्याने आगारांचे कामकाज बंद आहे़ नंदुरबार बस आगारातून दर दिवशी ६७६, शहादा ७५०, नवापुर ३६५ तर अक्कलकुवा बसआगारातून दर दिवशी २३५ अशा एकूण २ हजार बसफेºया रद्द झाल्या आहेत़ नंदुरबार आगारात ५७६, नवापुर आगारातील २३५, अक्कललकुवा २५० तर शहादा आगारातील ५०० कर्मचारी सुटीवर आहेत़ बस फेºया होत नसल्याने नंदुरबार आगाराचा दररोज होणारा ४२ होणारा ३३९ हजार किलोमीटर, नवापुर २४ हजार, शहादा ३४ हजार तर अक्कलकुवा आगाराचा १४ हजार किलोमीटर बसेसचा प्रवास थांबला आहे़ नंदुरबार आगारातून व शहादा आगारातून दिवसाला १५ ला, नवापूर ९ लाख ४० तर अक्कलकुवा आगारातून सुमारे साडेसात लाख रुपयांची कमाई होते़ यातून चारही आगारांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह कार्यशाळांमधील कामांवर भर दिला जातो़ सध्या कर्मचारी पगारी सुटीवर असले तरी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने चारही आगारांचे नुकसान हे कोट्यावधी रुपयांच्या घरात पोहोचणार आहे़ बसेस नसल्याने ग्रामीण भागाचा शहरी भागासोबतच संपर्क पूर्णपणे तुटला आहे़ बसेससोबतच खाजगी प्रवासी वाहनेही बंद करण्यात आली आहे़ यामुळे चालकांच्या रोजगारावर परिणाम होत असून त्यांनीही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत रविवारपासूनच वाहने बंद केली होती़ सोबतच शहरात येणाºया आराम बसेसही बंद झाल्याने नुकसानीचा आकडा मोठा होत आहे़