शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

चारही आगारातून आठ कंटेनरद्वारे होणार एस.टी.ची माल वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.महामंडळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नंदुरबार आगारानेही ही सेवा सुरू केली आहे. मालवाहतुकीची पहिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एस.टी.महामंडळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नंदुरबार आगारानेही ही सेवा सुरू केली आहे. मालवाहतुकीची पहिली एस.टी.रविवारी येथील आगारातून रवाना करण्यात आली.लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यापासून प्रवाशांची जीवनवाहिनी अर्थात लालपरी आगारात उभी होती. अशात मजुरांना पोहचविण्याची जबाबदारी मात्र पार पाडली. कोट्यावधी रुपयांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने मालवाहतूकीचा निर्णय घेतला. त्यानुसार नंदुरबार आगाराने देखील मालवाहतूक क्षेत्रात दमदार पदार्पण केले. रविवारी पहिली मालवाहू एस.टी.अर्थात कंटेनर असली, ता. धडगाव येथे रवाना करण्यात आला.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील शहरी तथा ग्रामीण भागातील प्रत्येक प्रवाशाची जीवनवाहिनी बनली आहे. त्यामुळे एसटीने देखील आता प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहू क्षेत्रात पदार्पण केले आहे. रविवारी नंदुरबार आगारातून पाठवण्यात आलेल्या पहिल्या मालवाहू ट्रक प्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक किशोर साळुंके, वाहतूक निरीक्षक रमेश वळवी, वाहतूक नियंत्रक प्रशांत गुजराथी, लिपिक प्रकाश बागुल, शाकीर शेख, चालक चंद्रकांत मोरे, हारुन सय्यद आदी उपस्थित होते. जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी एसटीतर्फे मालवाहू सेवा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नंदुरबार आगार, शहादा, नवापूर व अक्कल्कुवा आगारात संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार आगारातर्फे करण्यात आले आहे. गेल्या ७२ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागली.राज्य परिवहन महामंडळाच्या अधिसूचनेद्वारे मालवाहतुकीचा निर्णय घेण्यात आला असून नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचलित दराप्रमाणे अत्यंत माफक दरात सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विविध व्यवसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.

नंदुरबार आगारातून प्राथमिक टप्प्यात आठ मालवाहू ट्रक सुरू करण्यात आले आहे. यात नंदुरबार-२, शहादा- २, नवापूर-३, आणि अक्कलकुवा एक याप्रमाणे नियोजन आहे. पहिला मालवाहू ट्रक सातपुड्यात पाठवून मालवाहू सेवेचा श्रीगणेशा करण्यात आला तर दुसरा ट्रक सोमवार ८ जुन रोजी सातारा येथे रवाना होणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्गासह नागरिकांना देखील मालवाहू सेवा फायदेशीर ठरणार असल्याचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.