शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याअंतर्गत प्रत्येक गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाइन करणे, या उपाय योजनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल्यानंतर उपाययोजनांना वेग आला आहे़ या आजाराच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेत शासन उपाययोजना करत आहे. राज्य सरकारने यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा केली होती़ त्यानंतर केंद्र सरकारनेही लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात यानुसार कामकाज सुरु आहे़ ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने सील करण्याची कार्यवाही केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यावर भर देण्यात येत आहे़ कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी कोतवालाकडून प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरी भागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, अश्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेऊन उपाययोजनांना करण्याचे कळवण्यात आले आहे़जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेली एकही व्यक्ती आढळून आलेली नसल्याने इतर कोणासह प्रादुर्भाव झालेला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे़