शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा प्रकल्पात खावटीच्या कामाला गती, ३१ मार्चअखेर कामकाम पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे टाळेबंदी करण्याची नामुष्की प्रशासनावर आहे. त्यामुळे कामगांर बेरोजगार होत असून या पार्श्वभूमीवर ...

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे टाळेबंदी करण्याची नामुष्की प्रशासनावर आहे. त्यामुळे कामगांर बेरोजगार होत असून या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून सन २०२०-२१ या एक वर्षासाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आलेली होती. अनुसूचित जमातींच्या कुटुंबीयांना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य वाटप करणे, असे या योजनेचे स्वरूप होते. मात्र सुरुवातीपासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. योजनेची घोषणा होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील अनुसूचित जमातीच्या एकाही कुटुंबाला या योजनेचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळू शकला नाही.

यायोजने अंतर्गत लाभार्थ्यांचा सर्व्हे, पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून कागदपत्रे गोळा करणे आणि फॉर्म ऑनलाईन डीबीटी पोर्टलवर अपलोड करणे, कागदपत्रे अपलोड करणे, इत्यादी कामे दोन-तीन महिन्यांपूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली होती. मात्र आदिवासी विकास विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त होत नसल्याने योजनेच्या पुढील अंमलबजावणीचे काम रखडले होते. आदिवासी संघटना व लोकप्रतिनिधींकडूनदेखील खावटी योजनेचा लाभ तत्काळ देण्याची मागणी करण्यात येत होती. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या धडगाव दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना याबाबत विविध संघटनांकडून निवेदनेदेखील देण्यात आलीत.

या सर्व प्रक्रियेनंतर खावटीच्या अनुदान योजनेच्या कामाला पुन्हा गती मिळाल्याचे चित्र आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरलेल्या अर्जाला मान्यता देणे व त्याची नोंद अर्जावर घेणे व अर्ज दुरुस्तीसह तत्सम कामकाज करण्यासाठी तळोदा प्रकल्पातील शासकीय व अनुदानित कर्मचारी व तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव................ तालुक्यातील १८९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून खावटी योजनेसाठी अर्जाची माहिती प्रकल्प अधिकारी यांच्याकडील परिपूर्ण अर्जाला मान्यता देण्यात यावी. हे काम प्राधान्याने करण्याची गरज आहे. या कामासाठी शिक्षकासह मुख्याध्यापकांनी इंटरनेट नेटवर्क सेवा गावात नेमलेले शिक्षक पाठवावे, असे आदेश तळोदा, अक्कलकुवा, धडगाव शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

३१ मार्चअखेर मुदत

खावटी अनुदान योजनेचे हे सर्व कामकाज ३१ मार्चपर्यत पूर्ण करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी गांभीर्याने नोंद घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अविश्यांत............. पंडा यांनी दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश २५ मार्च रोजी निर्गमित करण्यात आले असून केवळ सहाच दिवसांत हे काम संपविण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांपुढे असणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, संसाधनांची अनुपलब्धता, या बाबी लक्षात घेता ३१ मार्च अखेर हे काम पूर्णत्वास जाईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.