सोन बुद्रुकची देवहोळी यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:25+5:302021-03-25T04:28:25+5:30

पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सरपंच, पुजारी, डाया, करवाण्या, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाचा वाढता ...

Son Budruk's Devholi will be celebrated in a simple way this year | सोन बुद्रुकची देवहोळी यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार

सोन बुद्रुकची देवहोळी यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार

पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सरपंच, पुजारी, डाया, करवाण्या, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत यंदाची होळीपूजा साध्या पद्धतीने, गर्दी न करता, पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सोन बुद्रुक येथील मानाची देवहोळी दरवर्षी होळीच्या पहिल्या दिवशी साजरी होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधक नियमांचे पालन करून यंदाची होळी आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे पोलीस पाटील मगन पावरा यांनी सांगितले.

होलिकोत्सव हा सण प्राचीन काळापासून येथील आदिवासी बांधव साजरा करत आले असून, होलिकोत्सव हा सण सातपुड्यातील आदिवासी लोकांचा एक मुख्य सण असून, ते यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत.

Web Title: Son Budruk's Devholi will be celebrated in a simple way this year