शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्ल्यूसाठी सहा पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी सहा पथके तालुका स्तरावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात दोन ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्यांचा मृत्यू हा विविध कारणांनी झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्ड फ्ल्यूची कुठलीही लक्षणे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले   आहे.जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या दरम्यान प्रकाशा व रायसिंगपूर (ता. अक्कलकुवा) याठिकाणी कावळे मरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पशुचिकित्सा विभागाने मृत कावळ्यांचे शवविच्छेदन केले असता, त्यांचा मृत्यू जखमा झाल्याने व इतर कारणाने झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने स्थलांतरित पक्षी, कोंबडी यांच्यावर विशेष नजर ठेवली जात   आहे.२००६मधील बर्ड फ्ल्यूने नवापूर येथील पोल्ट्री उद्योगाचे कंबरडेच मोडले होते. उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. लाखो कोंबड्या मारून पुराव्या लागल्या. लाखो अंडी नष्ट करावी लागली. त्यानंतर हा उद्योग अद्यापही पुरेशा प्रमाणात उभा राहू शकलेला नाही. पोल्ट्री हब म्हणून राज्यात नवापूरचे नाव अग्रभागी होते. ३०पेक्षा अधिक पोल्ट्री येथे होत्या. एका पोल्ट्रीमध्ये किमान एक लाख व जास्तीत जास्त दोन लाख पक्षी अर्थात कोंबड्या होत्या. अर्थात जवळपास ५० ते ६० लाख कोंबड्या, त्यापासून मिळणारी अंडी हे पाहता कोट्यवधींचा टर्नओव्हर त्यातून होत होता. सद्यस्थितीत केवळ १३ पोल्ट्री याठिकाणी आहेत. जवळपास १८ ते २० लाख कोंबड्या त्यामध्ये आहेत. जिल्ह्याचा विचार करता, जवळपास ७० पोल्ट्री उद्योग आहेत. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्य शासनाच्या कृती आराखड्यांतर्गत तालकुा स्तरावर सहा पथके व जिल्हा स्तरावर एक अशी सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पशुधन अधिकारीपासून इतर कर्मचारी आहेत. त्यांना शासनाच्या कृती आराखड्याचे दोनवेळा प्रशिक्षण दिले गेले आहे.