शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

45 वर्षावरील सहा लाख नागरीकांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नियाेजन सुरु ...

नंदुरबार : जिल्ह्यात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नियाेजन सुरु केले असून एकूण सहा लाख नागरीक ही लस घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात हे लसीकरण सुरु होणार आहे.

दरम्यान एकीकडे सहा लाख नागरीकांना लस देण्याचे नियोजन सुरु असताना दुसरीकडे लसींचा पुरवठा होणार तरी किती असा प्रश्न आहे. परंतू विभागाकडे दर आठवड्याला साधारण १० हजार लसींचा पुरवठा करण्यात येत असल्याने लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल अशी शक्यता आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन याचे एकूण एक लाख डोसेस आतापर्यंत पुरवण्यात आले आहे. यामुळे सहा लाख नागरीकांचे लसीकरणही वेळेत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

४५ वर्ष वयावरील सहा लाख नागरीकांचे सर्वेक्षण केले गेले पूर्ण

नंदुरबार जिल्ह्यात ४५ वर्ष वयावरील ६ लाख १३ नागरीकांची नोंद आहे. २०२१ मधील नियोजित लोकसंख्येचा आधार घेत ही आकडेवारी काढण्यात आली आहे. जिल्ह्याची आजअखेरीची नियोजित लोकसंख्या ही २० लाख ४३ असल्याची माहिती देण्यात आली आहे. यानुसार कामकाज सुरु करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य अशा ३९ ठिकाणी सध्या लसीकरण सुरु आहे. याच ठिकाणी या सहा लाख नागरीकांना लस देणे नियोजित आहे. दुसरीकडे तीन खाजगी रुग्णालयातही लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाना मागणीनुसार लसींचा केला जातोय पुरवठा

नंदुरबार जिल्ह्यात प्रारंभी १२ हजार डोसेज देण्यात आले होते. कालांतराने १० हजार डोसेज पुरवठा करण्यात आला. आरोग्य विभागाला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोसेज वेळोवेळी देण्यात आले आहेत. या कोविशिल्डचे सर्वाधिक ७० हजार डोसेज असल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित ३० हजार डोसेज हे कोव्हॅक्सिनचे आहेत. दोन्ही लसींचा पुरवठा हा दर आठवड्याला करण्यात येत आहे. येत्या काळातही मागणी तेवढा पुरवठा होईल अशी खात्री आरोग्य विभागाने वर्तवली आहे. लस पुरवठा करणा-यांकडे याबाबत सातत्याने माहितीही दिली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरु आहे. जिल्ह्यात काम करणारे हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण संपुष्टात येणार आहे. ज्येष्ठांचे लसीकरण सुरु आहे. एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वांना पहिला डोस वेळेत देवून दुस-या डोसची तयारी केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

-डाॅ. एन.डी.बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.