आगीमध्ये सहा लाखाचा ऊस जळून खाक

By Admin | Updated: May 18, 2017 18:36 IST2017-05-18T18:36:49+5:302017-05-18T18:36:49+5:30

सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आह़े

Six lacs of sugarcane burn in the fire | आगीमध्ये सहा लाखाचा ऊस जळून खाक

आगीमध्ये सहा लाखाचा ऊस जळून खाक

ऑनलाइन लोकमत

तळोदा, नंदुरबार, दि. 18 - तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात प्रवीण धर्मा पटेल यांच्या मालकीच्या पाच एकर क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला़ यात सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आह़े
बोरद शिवारात प्रवीण धर्मा पटेल यांच्या शेतात पाच ऐकर क्षेत्रफळावर ऊस लावण्यात आला होता़ वीज खंडीत असतानाही अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरातील ऊस जवळून खाक झाला आह़े याबाबत पटेल यांचे नातेवाईक  संजय नारायण पाटील यांना  शेतात आग लागल्याची माहिती देण्यात आली़ आग लागल्याचे समजताच पाटील हे तत्काळ घटनास्थळी पोहचल़े मात्र तोर्पयत   शेतातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता़ परिसरात जोरदार वारा  असल्याने   आगीने तीव्र रुप धारण केले होत़े त्यामुळे आग क्षणात संपूर्ण परिसरात पसरली होती़ घटनास्थळी दाखल झाल्यावर गावातील ग्रामस्थांनी लागलेली आग विझविण्यासाठी  प्रयत्न केल़े 
 आग कोणी लावली आहे की काय या दृष्टीने  पोलीस  तपास करीत असल्याचे सागण्यात आल़े दरम्यान संजय नारायण पाटील यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात  घटनेची नोंद करण्यात आली आह़े

Web Title: Six lacs of sugarcane burn in the fire