शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात : जिल्हाधिकारी भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व यंत्रणांनी केलेली चांगली कामगिरी आणि त्याला नागरिकांनी उत्तम साथ दिल्याने हे शक्य झाले आहे. अवघ्या महिन्याभरात आपण जिल्ह्याला परत एकदा पूर्वीच्या स्थितीकडे नेत आहोत. यापुढेही नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह संवादाच्यावेळी ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात दुकाने व आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर या दोन गोष्टी पाळल्या तर शासनाच्या मार्गदर्शनानुसार आणखी शिथीलता देता येईल.नागरिकांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता यावे यासाठी ई-पास प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ८,९०३ व्यक्तींना राज्यात व परराज्यात जाण्यासाठी पासेस देण्यात आल्याने २० हजारापेक्षा जास्त व्यक्तींना कुटुंबियांना भेटता आले. करोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामविकासाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ४१८ गावातील ३० हजार नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे. आतापर्यंत ३ कोटी ९३ लाख रुपये मजूरांच्या खात्यात जमा करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. करोनाच्या संसगार्चा धोका वृद्धांना अधिक असल्याने प्रशासन आणि पिरामल फाऊंडेशनतर्फे ‘सुरक्षित आजी-आजोबा’ अभियान राबविण्यात येत असून वृद्धांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना आवश्यक माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांना आपले व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी निविष्ठेची दुकानेदेखील सुरू ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त शेतकºयांकडील २९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मे महिन्यापूर्वी खरेदी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाचे संकट आणखी काही काळ चालण्याची शक्यता असून या संकटावर सर्व मिळून निश्चितपणे मात करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केला.