म्हसावदला दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:05+5:302021-04-18T04:30:05+5:30

राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन असतो. तरीही म्हसावद येथे शनिवारी सर्वच दुकाने ...

Shops closed in Mhaswad | म्हसावदला दुकाने बंद

म्हसावदला दुकाने बंद

Next

राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन असतो. तरीही म्हसावद येथे शनिवारी सर्वच दुकाने सुरू होती. खेड्यापाड्यांत कोरोना पसरल्याने सर्व रुग्ण म्हसावद येथे येत असल्याने गर्दी वाढत आहे. मात्र जे दुकानदार प्रामाणिकपणे दुकान बंद ठेवत आहेत त्यांनी शासकीय प्रशासनावर ठपका ठेवला. काही दुकानदार लालसेपोटी लॉकडाऊन असूनही हाफशटर डाऊन करून व्यवहार करीत होते. याबाबत ‘लोकमत’ला वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेऊन सकाळी ग्रामविकास अधिकारी भटेसिंग गिरासे, अशोक कोळी, पोलीस कर्मचारी भिलाला यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करा अथवा दंडाची पावती घ्या, असे सांगितले असता सर्वांनी स्वतःहून दुकाने बंद केल्याने कार्यवाही टळली.

दुकाने बंद करण्यास सांगितले असता कोणाही दुकानदाराने विरोध केला नाही. प्रत्येकाने आपापली दुकाने लवकर बंद केली. मात्र त्यांना सक्त सूचना दिलेली आहे. यापुढे कोरोना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी भटेसिंग गिरासे यांनी सांगितले.

Web Title: Shops closed in Mhaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.