शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शहादा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेने १०० टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेने १०० टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. शहरातील बाजारपेठ गल्ली ते कॉलनी, मुख्य परिसर, चौकाचौकात व रस्त्यांवर शुकशुकाट होता. कोरोनावर मात करण्यासाठी शहाद्यातील व्यापाऱ्यांनी छोटे-मोठे सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिल्याने प्रथमच शहर पूर्णपणे बंद झाले होते़जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहारतील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवून तसेच विविध कार्यक्रम थांबवून नागरिकांनी घरातच थांबून कोरोना व्हायरसला थोपवण्यात योगदान दिले़ पेपर विक्रेते, दूध वाटप करणारे आदी आवश्यक सेवा देणाऱ्यांनी सकाळी सात वाजेपूर्वीच कामे आटोपून घरी परतले. शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, गांधी पुतळा, मेनरोड, भाजी मार्केट, दोंडाईचा रोड, खेतिया रोड, डोंगरगाव रोड, स्वामी समर्थ चौक, पटेल रेसिडेन्सी चौक, स्टेट बँक चौक, नगरपालिका परिसर, बाजारपेठ, कॉलनी, गल्लीतील चौकाचौकात शुकशुकाट होता. शहरातील सर्व नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले होते. रुग्णालय, मेडिकल यासह अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यापारी संपूर्ण प्रतिष्ठान बंद असल्याने मुख्य रस्त्यांसह वसाहतींमधील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह महसूल विभाग, पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात गस्त घालून नागरिकांनी जनता कर्फ्यु दरम्यान घरातच थांबावे, असे आवाहन करीत होते. या आवाहनाला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील बसस्थानक परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहादा आगारातून रविवारी एकही बसफेरी झाली नाही.

 

सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात लेवा पाटीदार गुजर समाजातील विद्यार्थी, मुले, मुली किंवा बॅचलर असतील व ते काही कारणास्तव गावी जाऊ शकत नसतील व पुण्यात अडकले असतील त्यांना जर कुठल्याही प्रकारची पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अडचण येत असेल तर केदारेश्वर प्रतिष्ठानच्या ९४२०७९९०४१, ८२३७८७४५३५, ९७६२४८६६८३, ९८२३४६४७०३, ७६२०००४०२०, ९९२३१२१७२५ या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क करावा. शक्य ती मदत केदारेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला त्वरित करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी सात वाजेपासून शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाने घरी जाण्याचे आवाहन केले. पोलिसांतर्र्फेे सूचना देताना काही ठिकाणी नागरिकांना मारहाण झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पोलिसांच्या या कृत्यात माध्यमांचे प्रतिनिधीही सुटले नाही. वार्तांकन करणाºया माध्यम प्रतिनिधींशीही पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे़