शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

प्रशासनाच्या कारवाईनंतर शहादा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:24 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात बसलेल्या नागरिकांनी सोमवारी मात्र घराबाहेर पडत रस्त्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात बसलेल्या नागरिकांनी सोमवारी मात्र घराबाहेर पडत रस्त्यांवर गर्दी केल्याचे चित्र सकाळी निर्माण झाले होते. शहरात १४४ कलम लागू करण्यात आल्याची आठवण देत महसूल व पोलीस अधिकारी शहरातील विविध भागातील नागरिकांना घराबाहेर पडू नका, पाच लोकांपेक्षा जास्त जणांनी एकत्रित येऊ नका असे, आवाहन केल्यानंतर शहरातील व्यवहार पूर्णपणे बंद झाले होते.सोमवारी सकाळी भाजी मंडईत भाजीपाला विक्री सुरू झाल्यानंतर चढ्या भावाने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाला या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी भाजी मंडईत जाऊन विक्री बंद करण्याचे आदेश देण्यासह सामान जप्तीची कारवाई केली. त्याचप्रमाणे शहरात अत्यावश्यक सेवा व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेल्या जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. अशा दुकानावर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी दुकाने बंद करून कारवाई केली.सोमवारी सकाळपासून शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने पोलीस पोलीस प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. याचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारनंतर संपूर्ण शहर बंद झाले होते.मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये 31 मार्चपर्यंत एस.टी. बससेवा बंद करण्यात आल्याने दुसºया दिवशीही शहादा आगारातून एकही बसफेरी झालेली नव्हती. सलग दोन दिवस शहादा आगार बंद होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.४कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून १४४ कलम लागू कारण्यात आला आहे. मात्र असे असताना देखील शहादा शहरातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाºयांनी दुकाने उघडल्याने शहरातील नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच काही व्यापारी याचा फायदा घेत चढ्या दराने भाजीपाला विक्री करीत होते. जमावबंदी आदेश असताना मोठ्या प्रमाणावर नागरिक जमल्याने पालिका व पोलीस पथकाने सर्व दुकाने बंद करीत भाजी मंडई परिसरात कारवाई केली. काही विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले तर काहींनी सावलीसाठी केलेली सोय काढण्यात आली.