शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट पुन्हा कानावर आल्याने शाळांचा परिसर गजबजला. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलेल्या अर्थात पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसून येत होते. तर सहावी ते आठवीचे विद्यार्थी जुने सवंगडी भेटल्याने आनंदीत झाले होते. कोरोनाच्या भितीचा कुठलाही लवलेश विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. परंतु पालकांच्या मनातील भिती मात्र कायम होती. पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यासाठी तयारी सुरू होती. शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या. शिक्षकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत असून ६० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती कमी होती. असे असले तरी येत्या दोन ते तीन दिवसात उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांची तपासणी शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगनद्वारे ताप तर ॲाक्सीमिटरद्वारे शरिरातील ॲाक्सीजनची तपासणी करण्यात आली. मास्क सक्तीचा करण्यात आला होता.

एक दिवसाआड वर्ग भरविणार... विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या अनेक शाळा या एकदिवसा आड वर्ग भरविणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविता येणार आहेत. याशिवाय सलग एक ते पाच तासिका होणार असून मधली सुट्टी राहणार नाही

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने शाळेत आलो. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. मनातील भिती दूर केली.-जी.व्ही.पाटील, शिक्षक.

पाचवीच्या वर्गात यंदा प्रवेश घेतला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेत येण्यास मिळाल्याने आनंद झाला.          -मयुरेश जाधव,विद्यार्थी.शाळेचा पहिला दिवस व कोरोनाची भिती यामुळे आजच्या पहिल्या दिवशी मनात धाकधूक होती. परंतु शिक्षक व पालकांनी मनातील भिती दूर केली. -शारदा राजपूत, विद्यार्थीनी.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. येत्या काही दिवसात उपस्थिती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सर्व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. पालकांनी नि:संकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे.                             -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.